|| MumbaiCha Raja Chintamani Maza || || MumbaiCha Raja Chintamani Maza || || MumbaiCha Raja Chintamani Maza || || MumbaiCha Raja Chintamani Maza || || MumbaiCha Raja Chintamani Maza || || MumbaiCha Raja Chintamani Maza || || MumbaiCha Raja Chintamani Maza || || MumbaiCha Raja Chintamani Maza || || MumbaiCha Raja Chintamani Maza || || MumbaiCha Raja Chintamani Maza || || MumbaiCha Raja Chintamani Maza ||
|| मुंबईचा राजा चिंतामणी माझा || || मुंबईचा राजा चिंतामणी माझा || || मुंबईचा राजा चिंतामणी माझा || || मुंबईचा राजा चिंतामणी माझा || || मुंबईचा राजा चिंतामणी माझा || || मुंबईचा राजा चिंतामणी माझा || || मुंबईचा राजा चिंतामणी माझा || || मुंबईचा राजा चिंतामणी माझा || || मुंबईचा राजा चिंतामणी माझा || || मुंबईचा राजा चिंतामणी माझा || || मुंबईचा राजा चिंतामणी माझा ||

चिंचपोकळीचा चिंतामणी™ (Chinchpokli Cha Chintamani)

Vakratunda

About This Page

नमस्कार,
             चिंचपोकळीसार्वजनिकउत्सवमंडळ (चिं. सा. . मं.) सामाजिक एकतेसाठी सन १९२०सालापासून सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरवात केली. (चिं. सा. . मं.) हे मंडळ लालबाग-परळयाभागातील (गिरणगावातील) पहिलेमंडळ आहे. मंडळाचे स्वतःचे आरोग्यचिकित्साकेंद्र आहे, त्यामार्फत  वर्षातूनदोनवेळाखेडेगावांमध्येमोफतऔषधवाटप केले जाते, मंडळसंचालीत किलबिलनर्सरी, चिंतामणीसंगणकप्रशिक्षणकेंद्र, मोफत  वाचनालयग्रंथालय(२५वर्षापासूनसर्वप्रथमयामंडळाचे) याग्रंथालयामार्फतपदवीअभ्यासक्रमाचीपुस्तकेउपलब्धआहेततसेचमंडळाचीअभ्यासिकाआहे, १लीते१०वी, १२वी , तसेचपदवीअभ्यासयातीलप्रत्येकविषयातीलसरासरीत  प्रथमयेणाऱ्या  विभागातीलविद्यार्थ्यांचागुणगौरवसमारंभकेलाजातोगणेशोत्सव  नवरात्रीयाकाळातलहानवयोगटातीलमुलांपासूनतेगृहिणींपर्यंतयासर्वांसाठी  विविधस्पर्धांचेआयोजनकेलेजाते, अलीकडे पावर लिफ्टिंग महापौर चषक हि स्पर्धा श्रींच्या मंडपात यशस्वी रित्या पार पडली, नवरात्रीच्या दरम्यान अनेक मनोरंजक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अशाप्रकारे वैद्यकिय, शैक्षणिक, कला, क्रीडा, मनोरंजन या माध्यमातून आपल्या सामाजिक कार्याचा ठसा उमटवत आहे.
             वर्षातूनफक्तएकदाचवर्गणी काढून वरील कार्यक्रम पूर्ण करण्यात येतात. गणेशविसर्जनमिरवणूक D.J. किंवासिनेमांच्यागाण्यांवरकरताफक्तआरतीच्यातालावरसंपूर्णमिरवणूकपारपडते. दर वर्षी शिस्तबद्धमंडळ म्हणून काळाचौकी पोलीस ठाणे यांच्याकडून  गौरवण्यात येते. गणेशोत्सवाच्या काळात मंडळाचे सहाय्यक सदस्य, कार्यकारणी सदस्य व सर्व पदाधिकारी २४ तास श्रीं च्या मंडपात आपली सेवा रुजू करतात.
चिंचपोकळीच्याचिंतामणीचेयंदाचे९२वेवर्षअसूनशतकमहोत्सवाकडेवाटचालसुरुआहे. . . . .

           वर्षानुवर्षे ऋतुचक्र निर्मित ऊन, थंडी,वारा,पाऊस यानां समर्थपणे तोंड देत असतानाच आपल्या शीतल छायॆखाली पांथस्थांना सावली देणार्‍या महान वटवृक्षाप्रमाणे चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ गेली ९२ र्वर्षे अव्याहतपणे आपल्या धार्मिक सामाजिक , शैक्षणिक , आणि सांस्कृतिक कार्याद्वारे लालबाग,चिंचपोकळी सारख्या कामगार विभागात कार्यरत आहे.सार्वजनिक उत्सवाचे प्रणेते लोकमान्य टिळक यांना उत्सवातून अभिप्रेत असलेले समाजप्रबोधन आणि लोकशिक्षणाचे कार्य हेच या उत्सव मंडळाच्या कार्याचे मूळसूत्र आहे.
१९२० साल म्हणजे ऎन धामधुमीचे दिवस.स्वातंत्र्य हेच त्या पिढीचे स्वप्न होते.आजच्या सारखी भोंगी संस्कृती सोडून त्यागी संस्कृतीचे पाईक होण्याचे त्यावेळच्या समाजधुरीणांचे ध्येय होते.लोकमान्यांचा आदर्श बाळगणारे त्यावेळचे या विभागतील कै.दत्त्ताराम अर्जुन पुजारे,कै. महादेव बसनाक, कै.दत्त्ताराम रामचंद्र मयेकर, कॅप्टन ल.त्र्य.पाटणकर इत्यादींनी मंडळ स्थपनेत पुढाकार घेतला आणि नंतर कै.पांडुरंग म्हसकर,कै.गुणाजी सिताराम बागवे,कै.लक्ष्मण चव्हाण यांनी या कार्याची धुरा समर्थपणे पेलली.त्यावेळी मंडळाचे कार्यक्षेत्र होते लक्ष्मी नारायण व्यायाम शाळा ते काळाचौक रोड,शिवडी ते भारतमाता सिनेमापर्यंत वर्गणी होती फक्त चार आणे.
         मंडळाणे प्रथम मुर्ती बसविली ती डेक्कन कोरच्या जागेत. तेथून पुढे बावला बिल्डिंग क्रमांक १ च्या जागेत,तेथून वाण्याची चाळ, भारतीय तरुण संघाची जागा व नंतर १९३९ साली उत्सव मंडळ आजच्या जागेत स्थिरावले.१९४४ साली मंडळाच्या रौप्यमहोत्सव साजरा झाला.१९५६ साली मंडळाची घटना तयार झाली व मंडळाचे "चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ " हे व्यापक नाव देण्यात आले.उद्देश एवढाच की,मंडळाचे कार्य गणेशोत्सवापुरते मर्यादित न राहता मंडळ वर्षभर कार्यरत रहावे.त्यावेळच्या कार्यकर्त्यांनी दूरदृष्टीने घेतलेला हा निर्णय आज २०११ साली किती अचूक व दूरगामी होता हे मंडळाचे वर्षभर विविध स्तरांवर चालणारे कार्य दर्शविते.१९५३ साली मंडळाचा नवरात्रौत्सव सुरु झाला. मंडळाच्या कार्याचा आज इतका व्याप व खर्च वाढूनही त्यावेळेपासून फक्त गणेशोत्सवात एकदाच वर्गणी काढून वर्षभर मंडळ कार्यरत ठेवण्याची परंपरा आजतागायत काय आहे. कोणतीही संस्था नावारुपाला येत असताना विविध स्थित्यंतरातून जाते.किंबहुना प्रत्येक स्थित्यंतर हीच पुढील विकासाची एक एक पायरी ठरत असते. परिवर्तन हा विकासाचा स्थायी भाव आहे.जो अशा बदलाला विरोध करतो तो प्रवाहपतित होऊन नष्ट होतो.
         १९६८/६९ साली अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत निव्वळ १५ ते २० दिवसांच्या अवधीत मंडळाने आपला सुवर्ण महोत्सव जिद्दीने व थाटामाटाने साजरा केला. तत्पुर्वी १९६९ साली मंडळाच्या त्यावेळच्या कार्यकर्त्यांनी मेहनतपूर्वक पैसे जमा करुन मंडळाला स्वत:चे कार्यालय प्रोग्रेसिव्ह बिल्डिंग क्रमांक १ येथे उपलब्ध करुन दिले.मंडळाला जेव्हा स्वत:चे कार्यालय नव्हते.तेव्हा कुणाच्या तरी घरी बसून किंवा शिन्नाप्पा शेट्टी यांच्या हॉटेलात बसून मंडळाचे हिशेब लिहिले जायचे.तेथेच मंडळाच्या बैठका व्हायच्या.त्यावेळच्या कार्यकर्त्यांनी हे धाडस केले त्या सर्वांचे फार मोठे ऋण या मंडळावर आहे. १९६८/६९ हे सुवर्ण महोत्सवी वर्ष मंडळाच्या अमुलाग्र बदलाची नांदी ठरले.अत्यंत बिकट परिस्थितीत प्रमुख कार्यकर्त्यांनी जनतेच्या पाठिंब्यावर व इतर कार्यकर्त्यांच्या साथीने सुवर्ण महोत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला.त्यानंतरचे प्रत्येक वर्ष मंडळाला जणू नवजीवन घेऊनच आले.दिसामासी मंडळाला उभारी आली.मंडळाच्या कामाला वाहून घेणारे सुशिक्षित सुजाण व व्यवहारी कार्यकर्ते मंडळाला लाभत गेले.ज्यामुळे गेल्या पंचवीस वर्षाची मंडळाची वाटचाल मंडळाला नव्हे, तर सातत्याने या मंडळात काम करणार्‍या कार्यकर्त्यांनी ललामभूत ठरली. मंडळाने आपला हीरक महोत्सव १९७९ साली अत्यंत थाटामाटाने साजरा केला. श्री गजानन ही आद्य देवता आहे असे आपण मानतो. प्रत्येक कार्याचा आरंभ मुळी आपण श्री गणेशाय नम: या गणेश स्तवनाने करतो. त्यामुळेच या उत्सवाचे मांगल्य व पवित्र्य टिकविणे महत्त्वचे आहे. मंडळाच्या स्थापनेपासून पौराणिक विषयावर देखावा सादर करणे ही मंडळाची परंपरा आहे. तसेच नवनवीन व होतकरु मूर्तिकारांना मंडळाने आपले व्यासपीठ उपलब्ध करुन दिलेले आहे. कै. शाम सारंग , कै. दीनानाथ वेलिंग या नामवंत मूर्तिकारांनी आपली कलाकृती या मंडळाच्या गणेशोत्सवात सादर केली होती हे या ठिकाणी आम्ही आवर्जून नमूद करतो. सध्या श्री.विजय खातू हे तरुण व कल्पक मूर्तीकार मंडळासाठी गणेश देखावा सादर करतात.
         १९८२ साली झालेल्या गिरणी कामगारांच्या दीर्घ संपामुळे येथील गिरणी कामगार उध्वस्त झाला. त्यावेळी मंडळाची आर्थिक कुचंबणा होणार असे वाटत होते.परंतु या सर्व कामगार बंधुनी उत्सव मंडळाला असणारा मदतीचा हात कधीच आखडता घेतला नाही, हे या ठिकाणी आवर्जून नमूद करावयास हवे. मंडळाच्या कार्याचा विस्तार होत असताना जागेची तीव्र टंचाई जाणवत होती व जागे अभावी काही उपक्रम बंद पडतात की काय, अशी कार्यकर्त्यांना भिती वाटत होती. परंतु इच्छा असेल तर मार्ग दिसेल या प्रमाणे आज मंडळाकडे स्वत:चे कार्यालय , ग्रंथालय कक्ष व आरोग्य चिकित्सा केंद्र, किलबिल नर्सरी(बालवाडी), चिंतामणी संगणक प्रशिक्षण केंद्र अशा पाच जागा आहेत. अनेक सामाजिक व सेवाभावी उपक्रम प्रथम सुरु करण्याचा मान मुंबई शहरात या मंडळाकडे जातो. मंडळ आज आर्थिक सुस्थितीत आहे. परंतु महागाई व उपक्रम राबविण्यासाठी येणारा वाढता खर्च याची तोंडमिळवणी करणे दिवसें दिवस बिकट होत चाललेले आहे. आज मंडळाचा २००७-०८ चा ताळेबंद सुमारे लाख रुपयांवर गेलेला असून मंडळाच्या सुधारीत घटनेप्रमाणे इमारत निधी, शैक्षणिक निधी इत्यादीसाठी योग्य ती तरतूद करण्यात येते.
            सेवाभावी संस्थेचे काम पक्षातीत असले पाहिजे हा या मंडळाचा प्रारंभापासूनच कटाक्ष होता, गेल्या २५ वर्षात विविध पक्षांचे कार्यकर्ते आपली राजकीय पादत्राणे बाहेर ठेवून उत्सव मंडळाच्या कार्याचा हा रथ पुढे नेत आहेत हे आवर्जून नमूद करावयास हवे. हे मंडळ म्हणजे कार्यकर्ते निर्माण करण्याची कार्यशाळा आहे असे म्हटले जाते. मंडळाच्या माध्यमातून कामास सुरवात करुन आज विविध स्तरांवर हे कार्यकर्ते नावारुपास आलेले आहेत याचा , मंडळास रास्त अभिमान आहे. वैचारीक अधिष्ठान व सेवा हाच स्थायीभाव असलेल्या या उत्सव मंडळासारख्या संस्था सामाजिक जीवन संपन्न व सुसंस्कृत करतात. समाजाची सर्व दु:खे जरी दूर करता आली नाहीत तरी ती सुसह्य करण्यासाठी झटतात व समाजात जागल्याचे काम करतात. म्हणूनच समाज , सरकार, राजकीय पक्ष, प्रसिध्दी माध्यमे , दानशूर संस्था यांनी आपले सक्रीय पाठबळ अशा संस्थेच्या मागे उभे केले पाहिजे. सुरवातीलाच म्हटल्याप्रमाणे आव्हानांना मंडळाने कधीच पाठ दाखविलेली नाही किबंहूना प्रश्नांना हात घालीतच मंडळाची वाटचाल झालेली आहे. आजची विभागातील तरुण पिढी सुशिक्षित ,सुसंस्कृत आहे. मंडळ गेली कित्येक वर्षे जमविलेल्या निधीचा फार मोठा हिस्सा शैक्षणिक कार्यावर खर्च अशा वेळी सामाजिक बांधिलकी म्हणून किमान २ वर्षे या तरुण पिढीने मंडळाच्या कार्यात सहभागी व्हावे अशी अपेक्षा मंडळाने केली तर वावगे ठरणार नाही. मंडळाच्या कार्याची राज्य पातळीवर विविध संस्था, प्रसिध्दी माध्यमे यांनी योग्य ती दखल घेतलेली आहे. तेव्हाचे दैनिक लोकसत्ताचे संपादक श्री माधवराव गडकरी यांनी दिनांक १८/०८/९५ च्या अग्रलेखात मंडळाचा केलेला गौरव हेच उदाहरण वानगीदाखल पुरेसे ठरेल.
             सामाजिक धनाचे आपण विश्वस्त आहोत ही विश्वस्तांची भावना आज मंडळाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनात आहे. म्हणूनच अमृत महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करीत असतानाच समाजाने मला काय दिले यापेक्षा मी समाजाला काय देतो हा विचार मनात ठेवून मंडळ उभारीत असलेल्या व आपण या सर्वांचे स्वप्न असलेल्या आरोग्य केंद्राची उभारणी या वर्षात पूर्ण करुन ती समाज चरणी अर्पण करण्यासाठी आम्ही वचनबध्द आहोत. मंडळाचे अनेक कार्यकर्ते गेली २५ वर्षे सातत्याने आपआपला कामधंदा सांभाळून मंडळाच्या उत्कर्षासाठी झटत आहेत. त्यातील काहीजण तर रौप्य , सुवर्ण व हीरक महोत्सवाचे साक्षीदार आहेत. आज हा अमृत महोत्सव साजरा करण्याचे सदभाग्य याची देही याची डोळा त्यांना लाभलेली आहे. ही तर त्या जगन्नियंत्याची कृपा.
             आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये उत्सव मंडळाने फार मोठे काम केलेले आहे असं आमच कधीच म्हणणं नव्हत आणि असणार ही नाही. ’अपूर्णावस्थेतच पूर्णत्वाचे बीज असते ’ जेव्हा पूर्ण विकास झाल्यावर भास होतो तेथे विकास खुंटतो या विचार सरणीवर आज आम्हा सर्व कार्यरत कार्यकर्त्यांचा विश्वास आहे. या कामामध्ये आमच्याही काही चुका झाल्या असतील परंतु TO ERR IS A HUMAN NATURE या वाक्याने या चुका आपण सर्वांनी समजून घेतल्या. सर्व जनता जनार्दन वर्गणीदार, देणगीदार, जाहिरातदार, हितचिंतक तनमनधनाने या मंडळाची एकरुप झालेत. गेल्या ९१ वर्षाच्या कालावधीत असंख्य व्यक्ती, संस्थानी या उत्सव मंडळाच्या जडणघडणीत जे योगदान दिले त्याबद्दल मंडळ त्यांना सदैव मानाचा मुजरा करीत आहे. याजसाठी केला होता अट्टाहास शेवटचा दीस गोड व्हावा या उक्तीप्रमाणे आमच्या या ९२ व्या वर्षाच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आपणा सर्वांना हार्दीक निमंत्रण देत आहोत. त्या अनुषंगाने महोत्सवाच्या निमित्तने आपल्यात निर्माण झालेले ऎक्य व सद्भावना मंडळाच्या शताब्दी वर्षाकडे उज्वल वाटचाल करण्याकडे परावर्तीत होवो व यावच्वंद्र दिवाकरी उत्सव मंडळाच्या कार्याचा हा नंदादीप अविरतपणे तेवत राहो. फुटीरता व जातियता यांनी ग्रासलेली आपली भारत मातृभूमी पुन्हा एकदा अखंड बलशाली व सुवर्णभूमी व्हावी. आपणा सर्वांना वैभव व सौख्य लाभावे हीच श्री चिंतामणी व अंबाभवानीकडे प्रार्थना.